Share

‘बिडकीन ग्रामीण रूग्णालयास आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणार’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  कोरोना विषाणू प्रसाराला आळा घालण्यासाठी बनवण्यात आलेली प्रतिबंधात्मक लस पात्र व्यक्तींना अधिकाधिक प्रमाणात देण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी बिडकीन ग्रामीण रूग्णालयाच्या पाहणी दरम्यान दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, दररोज किमान 100 नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. ग्रामीण रुग्णालयाची नवी इमारत कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावी. जुन्या इमारतीत कोविड व्यतिरिक्त रुग्ण आणि गरोदर महिलांवर उपचार करण्यात यावेत. त्याचबरोबर जुन्या इमारतीत सुरू असलेले लसीकरण स्वतंत्र् अशा वेगळ्या ठिकाणी करण्यात यावे, अशा सूचना येथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या.

कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रत्येकाने जनजागृतीवर भर द्यावा. रूग्णांना चांगली सुविधा, सेवा द्यावी, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केले. शहराबरोबरच कोरानाचे रुग्ण ग्रामीण भागात देखील खुप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी रविवारी बिडकीन येथील आरोग्य केंद्रासह पैठण तालुक्यातील सर्व रुग्णालयातील उपचारासाठी लागणारे साहित्य, वैद्यकीय अधिकारी, यंत्रणा कशी काम करते, काही कमतरता आहे का? या बाबतची पाहणी देखील चव्हाण यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!