🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. छगन भुजबळ यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, संजय जोशी, गीता जोशी यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे. ‘छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून महाराष्ट्र सदन केस मधून डिस्चार्ज मिळाला आहे. ह्या डिस्चार्ज ला मी हाय कोर्टात चॅलेंज करणार आहे.’ असे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.
दरम्यान सन २००५-०६ मध्ये छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्यावर महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी के.एस.चमनकर या कंपनीला निवीदा न मागवता थेट कंत्राट देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या बदल्यात भुजबळ परिवारातील लोकांना मोठ्या प्रमाणाच लाच मिळाल्याचाही आरोप लावण्यात आला होता.
तर भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांना याच आरोपांमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. कोर्टाने या प्रकरणातील चमणकर डेव्हलपर्समधील पाच जणांची सुटका करताना असंही म्हटलं आहे की, ‘तथ्य आणि पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की डेव्हलपर के एस चमणकर एंटरप्रायझेसने व्यवहारात कोणतीही अनियमितता केलेली नाही. तसेच करारामध्ये विकासकाला कोणताही अनुचित लाभ देण्यात आलेला नाही.’ याच आधारे त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली; शिवसेना नेत्यानेच केला दावा
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे – पटोले
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
