🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेने येवल्यातून संभाजी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र धक्कादायक बाब अशी की, आता राष्ट्रवादीचे सरचिटणीस माणिकराव शिंदे यांनी संभाजी पवार यांच्याशी हातमिळवणी केली असून आपण शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
शिंदे यांनी शिवसेनेच्या उम्देवाराचा प्रचार करणे म्हणे छगन भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. येवल्यातून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ तर शिवसेनेकडून संभाजी पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येवला हा छगन भुजबळांचा मंतदारसंघ आहे. भुजबळांवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस शिंदे यांनी पवारांशी हात मिळवणी केल्यामुळे येवल्यामध्ये राष्ट्रवादीविरोधात शिवसेनेची ताकद वाढली अशी चर्चा आहे.
येवला मतदार संघात शिवसेनेची वाढलेली ताकद आणि स्वपक्षाकडूनच मिळणारे आव्हान त्यामुळे यंदाची निवडणूक छगन भुजबळ यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी रविवारी येवल्याच्या ग्रामीण भागात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. येवला मतदारसंघ भुजबळांचा बालेकिल्ला आहे. यावेळी जर ते पुन्हा या मतदारसंघातून निवडून आले तर सलग चार वेळा या निवडून येणारे नेते ठरणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1181882192571424768?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181887067610959872?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
