Share

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या बोल्ड डान्सने चाहत्यांना घातली भुरळ

Published On: 

मुंबई : ‘तिनका तिनका’ या गाण्यावर डान्स करून चाहत्यांचे लक्ष वेधणारी भोजपुरी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मोनालिसा नुकतीच चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर विविध ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतंच मोनालिसाने ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात मोनालिसा ही प्रियांकाच्या ‘तिनका तिनका’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना मोनालिसाने सुंदर साडी नेसली आहे. मोनालिसाच्या डान्स करतानाच्या अदा पाहून चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे. मोनालिसाचा हा व्हिडीओ पाहून तिचे असंख्य चाहते कमेंट करत कौतुक करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/reel/CWDhlcbI-jn/?utm_source=ig_web_copy_link

मोनालिसाच्या या व्हिडीओवर सो क्यूट, ‘मोना ऑन फायर’, ब्युटीफुल, असे म्हटले आहे. मोनालिसाचे मूळ नाव अंतरा बिस्वास असून ती भोजपुरी चित्रपटातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने १२५ पेक्षा जास्त भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी, बंगाली, ओदिशा, तामिळ, कन्नड आणि तेलगु चित्रपटातही तिने काम केले आहे. २०१६ मध्ये बिग बॉसच्या १० व्या सिझनमध्ये मोनालिसा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मोनालिसा एकता कपूरच्या ‘नजर’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!