पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs CSK) यांच्यात रंगत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्याच चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नई संघात मोईन अली परतला आहे. आरसीबीचा संघ १० पैकी पाच सामने जिंकून सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, चेन्नई नऊपैकी तीन सामने जिंकून नवव्या स्थानावर आहे. या मोसमातील दोन्ही संघांची ही दुसरी गाठ आहे.
फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने त्यांचे मागील सलग तीन सामने गमावले आहेत. संघाची मजबूत फलंदाजीची फळी आता त्यांची कमकुवत दुवा बनली आहे. आघाडीच्या फलंदाजांनी सातत्यपूर्ण धावा केल्या नाहीत आणि त्यामुळे गोलंदाजांनाही फारसे काही करता आलेले नाही. विराट कोहलीने शेवटच्या सामन्यात झळकावलेले अर्धशतक ही संघासाठी चांगली गोष्ट म्हणता येईल.
#CSK have won the toss and they will bowl first against #RCB.
A look at the Playing XI for #RCBvCSK
Live – https://t.co/qWmBC0lKHS #TATAIPL pic.twitter.com/MyCp99JoJI
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2022
चेन्नई सुपर किंग्जने गेल्या सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे जबरदस्त लयीत दिसले. या सामन्यातही सर्वांच्या नजरा या दोघांवर असतील. मधल्या फळीत अंबाती रायुडू आणि एमएस धोनीही फॉर्मात आहेत. गोलंदाजीत संघ नक्कीच थोडा कमकुवत आहे आणि विरोधी संघ त्याचा फायदा घेऊ शकतो.
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महीश थिक्षना.
रॉयल चॅलेंजर्सल बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

