🕒 1 min read
मुंबई : तिरुमाला आणि तिरुपती देवस्थान (बालाजी) परिसरात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटना घडत आहेत. या देवस्थान परिसरातील चेकपोस्टवर महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडया अडवण्यात येत आहेत. जर देवस्थान परिसरात दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर गाडीमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती किंवा गाडीवर असलेला फोटो काढून टाकण्यास सांगितले जात आहे. या घटना सांगतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनांचा महाराष्ट्रातून तीव्र निषेध केला जात आहे. यातच आता या मुद्द्यांवरून भीम आर्मी या संघटनेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणू ख्याती असलेल्या शिवाजी महाराजांचे फोटो काढण्याच्या मुद्द्यावर भीम आर्मी म्हणत आहे कि, “शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आज महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले आणि देऊळे-मंदिरे सुरक्षित आहेत. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची मूर्ती आणि फोटोवर आक्षेप घेण्यात येत आहे. तिरुपती देवस्थान परिसरात शिवाजी महाराज यांची मूर्ती किंवा फोटो असलेलल्या गाडयांना मनाई केली जात आहे. मूर्ती किंवा गाडीवर असलेला फोटो काढून टाकण्यास सांगितले जात आहे. शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन केला जाणार नाही. असा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
तसेच त्यांनी देवस्थान प्रशासनाला इशाराही दिला आहे. आंध्रप्रदेशात सध्या काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. मात्र यासगळ्या प्रकरणावर त्यांनी काहीही अधिकृत भाष्य किंवा कारवाई केलेली नाही त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल किती आदर आहे, ते स्पष्ट येत आहे. या सर्व घटना त्वरित थांबल्या नाहीत तर तिरुपती देवस्थानच्या व्यवस्थापकांना चोप देऊ आणि भीम अर्मीच्या वतीने देशभर आंदोलने करू. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी आणि नागरिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही भीम आर्मीकडून करण्यात आली आहे.
अजित पवारांनी घेतली दखल
“तिरुपती, तिरुमाला देवस्थानशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो अथवा मूर्ती असलेल्या वाहनांना तिथे प्रवेश नाकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. या आधीही असाच प्रकार निदर्शनास आला होता. त्यावेळी मी तिथले ट्रस्टी मिलिंद नार्वेकर यांच्याशी बोललो आहे. पण त्यांना काही अडचण नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच तुम्ही आज या प्रकरणी स्टेटमेंट करा असं मी त्यांना सांगितलं आहे. कारण लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. त्यामुळे अशा बातम्या येणं हे चुकीचं आहे”, असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Uddhav Thackeray । ते शिवसैनिक नाहीत, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Nana Patole : राज्यातील ED सरकार झोपी गेलेलं बहिर सरकार आहे – नाना पटोले
- Ajit Pawar | मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी फिल्डवर उतरून पाहणी करावी; अजित पवारांचा सल्ला
- Tanushree dutta and Nana Patekar | “मला काही झाले तर नाना पाटेकर,…”; तनुश्री दत्ताची खळबळजनक पोस्ट
- Ajit Pawar | “मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी…” ; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
