नागपूर : राज्यात नवे सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नाहियेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी लागणाऱ्या विलंबामुळे विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सराकारवर निशाणा साधला आहे. “सरकार कोसळण्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला” असल्याची टीका पटोलेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली आहे.
राज्यात ईडीचे सरकार आहे त्यामुळे ब्लॅकमेलिंग आणि दबावतंत्र होणारच. राज्याच्या विकासकामांनाही शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. घटनेनुसार नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणे बंधनकारक आहे. अद्याप हा विस्तार झाला नसून हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tanushree dutta and Nana Patekar | “मला काही झाले तर नाना पाटेकर,…”; तनुश्री दत्ताची खळबळजनक पोस्ट
- Ajit Pawar | “मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी…” ; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला
- Aditya Thackeray | महाराष्ट्रात दोनच लोकांचं जम्बो कॅबिनेट; आदित्य ठाकरेंचा टोला
- Aaditya Thackeray | अजाणचा आवाज ऐकताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण; व्हिडीओ व्हायरल
- Navneet Rana | नवनीत राणांचा जीव धोक्यात! राजस्थान सीमेवरून आलेल्या लोकांनी केली घराची रेकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

