Ajit Pawar | वर्धा : सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. सध्या ते विदर्भातील पूरग्रस्त दौऱ्याची पाहणी करत आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच सरकारने लवकरात लवकर येऊन पाहणी करावी, अशी मागणी करत सरकारवर निशाणा साधत आहेत. अजित पवार हे वारंवार सरकारला मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही याबाबत प्रश्न विचारत आहे. आज सकाळी ते नागपूर दौऱ्यावर होते. यानंतर आता दुपारी ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले कि, आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला. पण आता थांबण्याची त्याची तयारी नाही. ही बाब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्षात घेऊन तातडीने मदत द्यावी. मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? इथे फिल्डवर उतरूनच बघावं लागतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला. जिथे जीवीतहानी झाली, तिथे चार लाखांची मदत मिळाली आहे. मात्र जनावरेही मृत्यूमुखी पडली त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यासाठी देखील मदत जाहीर करावी.
दरम्यान, अजित पवारांनी देखील नागपूर दौऱ्यादरम्यान टीका केली आहे. यावेळी आज पूरपरिस्थिती शेतकरी व्याकूळ आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. आम्ही जर काही सांगितलं तर तुम्ही नव्हता का सातजणं? तुम्ही नव्हता का पाचजणं? हे काही उत्तर नाही. पंचनामे कसे होतील, त्यांना मदत कशी मिळेल हे उत्तर पाहिजे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे देणं हे उत्तर असलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
तसेच यावेळी राज्यात 32 दिवस पाच लोकांचंच मंत्रिमंडळ होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यावर अजित पवार म्हणाले कि, आमच्या सरकारमध्ये पाच नाही तर सात मंत्री होते. तसेच हे सर्व मंत्री मुख्यमंत्रीपदाच्या ताकदीचे होते, असं सांगतानाच त्यांनी यांनी ठाकरे सरकारमधील सुरुवातीच्या सात मंत्र्यांची यादीच वाचून दाखवली. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, यांनी शपथ घेतली होती. यातील काहीतर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी माणसे होती.
महत्वाच्या बातम्या :
- Tanushree dutta and Nana Patekar | “मला काही झाले तर नाना पाटेकर,…”; तनुश्री दत्ताची खळबळजनक पोस्ट
- Ajit Pawar | “मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी…” ; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला
- Aditya Thackeray | महाराष्ट्रात दोनच लोकांचं जम्बो कॅबिनेट; आदित्य ठाकरेंचा टोला
- Aaditya Thackeray | अजाणचा आवाज ऐकताच आदित्य ठाकरेंनी थांबवलं भाषण; व्हिडीओ व्हायरल
- Navneet Rana | नवनीत राणांचा जीव धोक्यात! राजस्थान सीमेवरून आलेल्या लोकांनी केली घराची रेकी


