Share

Uddhav Thackeray । ते शिवसैनिक नाहीत, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Published On: 

Uddhav Thackeray । मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे खरी शिवसेना हि आमचीच असा प्रबळ दावा एकनाथ शिंदे गट करत आहे. शिवाय त्यांनी पक्षाची नवी कार्यकारणी घेऊन पद वाटप करत आहेत. यानंतर पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे आक्रमक झालेलं राज्याने पाहिलं. मात्र यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आता आक्रमक झाले आहेत.

आज शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला लक्ष्य केलं. पुढे यावेळी ते म्हणाले कि, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हवा आहे. मात्र, त्यांचा मुलगा नकोय. मी बाळासाहेबांचा वारसा पुढे घेवून चाललोय म्हणून मी त्यांना नकोय. तुम्ही याला घराणेशाही म्हणता तर म्हणा. लोकसभा निवडणूकीत युती होती. आमच्या खांद्यावर पाय ठेवून तुम्ही दिल्ली गाठली. मात्र 2014 च्या विधानसभेत असे काय झाले की तुम्ही त्यावेळी एकला चलो रे चा नारा दिला. कारण त्यावेळी तुम्हाला शिवसेना संपवायची होती, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

यानंतर पुढे ठाकरे म्हणाले कि, आता तुम्ही म्हणणार की आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. ते शिवसैनिक नाही तर दगाबाज मुख्यमंत्री आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी शिंदेंवर नाव न घेता केली. तर आज पुन्हा एकदा त्यांनी बाळासाहेबांच्या नाव वापरण्यावरून टीका केली. ते म्हणाले, मी प्रत्येक दिवशी त्यांना आव्हान देतोय की जर मर्दांची अवलाद असाल तर स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावून निवडणूक लढा. हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा शिवसेना कशाला चोरता? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, याआधी २६ आणि २७ जुलैला सरकार स्थापन झल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी एक मोठी मुलाखत दिली. हि मुलाखत सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी बाळासाहेबांचे नाव न वापरता निवडणूक लढविण्याचे आव्हान केले. तसेच भाजपाला शिवसेना संपायची आहे, असा आरोप देखील त्यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!