Share

‘उद्धव ठाकरेंची भेट घेतलेल्या भास्कर जाधवांनी मागितले राष्ट्रवादीकडे मुलासाठी तिकीट’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

गेले चार दिवस गुहागरचे आमदार भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अशी भेट झाली नसल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. अखेर याबाबत जाधव यांनी स्वतः भेट झाल्याचा खुलासा केला.

मुलगा विक्रांत जाधव याच्यासाठी गुहागरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मी मागितले आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि माझी भेट मुंबईत झाली. याभेटीत मनमोकळ्या गप्पा झाल्या, सगळ्याच विषयांवर झाली चर्चा, असा भास्कर जाधव यांनी खुलासा केला आहे.यामुळे राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!