मुंबई : मुंबईतल्या कुणबी भवनासाठीच्या 5 कोटींच्या सरकारी निधीच्या बदल्यात दापोलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर केला आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची २०२४ साली रिक्त होणारी जागा राष्ट्रवादीत गेलेल्या पदाधिकाऱ्यांना सुनील तटकरे यांनी द्यावी, असा सल्ला भास्कर जाधवांनी तटकरे यांना देत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतल्याने कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा कुणबी समाज्याला द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली. त्याच बरोबर कुणबी समाज्यावर सुनील तटकरे यांचे खूप प्रेम आहे की आपल्या घराण्याकरिता प्रत्येक गोष्ट करत आलेत हे सिद्ध करण्याची ही नामी संधी असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. या पार्श्वभूमीवर आता भाजपते नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधवांवर हल्लाबोल केला आहे.
भास्कर जाधवने कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी. सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन तटकरेंनी कुणबी समाज घटकांना प्रवेश दिला असं नीच वक्तव्य जाधवने केले. कुणबी समाज १ स्वतंत्र ताकत आहे त्यांना कोणाच्या उपकाराची गरज नाही, भास्करची लायकी नाही कुणबी समाजावर बोलायची, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
शिवसेना आमदार भास्कर जाधवने कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी. सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन तटकरेंनी कुणबी समाज घटकांना प्रवेश दिला असं नीच वक्तव्य जाधवने केले. कुणबी समाज १ स्वतंत्र ताकत आहे त्यांना कोणाच्या उपकाराची गरज नाही, भास्करची लायकी नाही कुणबी समाजावर बोलायची.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 18, 2021
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांची औलाद आहे…दडपशाहीला भीक घालणार नाही; रविकांत तूपकर आंदोलनावर ठाम
- …त्यामुळेच वानखेडेंनी पहिल्या पत्नीच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अडकवले- नवाब मलिक
- नुसरत आणि निखिल यांचा विवाह भारतीय कायद्यानुसार अवैध ; न्यायालयाचा निर्णय
- राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीप्रमाणे- शशी थरूर
- आमच्यावर आरोप करायला लावून केंद्र सरकारने परमबीर सिंहांना पळवून लावलं- संजय राऊत


