Share

Bhaskar Jadhav | “भाजपने महापुरुषांचा अपमान करण्याची सुपारी…”; भास्कर जाधवांची खोचक टीका 

Published On: 

🕒 1 min read

Bhaskar Jadhav | नाशिक : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी शिवरायांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. यावर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधलाय.

ते म्हणाले, “देशात, महाराष्ट्रात भाजपचे संबंधी लोक आणि अधिकारी यांनी महापुरुषांचा अपमान करण्याची सुपारी घेतलीय. हे मोठं षडयंत्र आहे. “40 आमदार फोडून भाजपच्या हाताला काहीच लागलं नाही. भाजपला चारीमुंड्या धूळ चारायची असं स्वाभिमानी जनता ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप दंगल घडवू पाहत आहे. विविध वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असल्याचंही भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणालेत.

यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणे (Narayan Rane)  यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. चार-पाच वर्षात राणे यांना कोणी सभेला का बोलावलं नाही. त्यांच्या बोलण्याला किंमत नाही. उद्धव ठाकरे आणि शिवसेना लक्ष देत नाहीत. पोलीस बदल्यांचा सपाटा, मंत्रालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याचं जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी सांगितलं की, महाराष्ट्र कुठे जाणार, याची चिंता सतावतेय. खोके सरकारचा कारभार असाच सुरू आहे. प्रशासनाचा खेळखंडोबा सुरू आहे. तुकाराम मुंढे यांना फार महत्त्व देण्याचे काम नाही. तेच कायम का वादात येतात?, असा सवालही जाधव यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!