Anand Paranjpe | मुंबई : आज शिवप्रतापदिनी भाजप (BJP) नेते मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी प्रतापगड येथे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेशी केली. यावरुन राजकारणात खळबळ उडाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी लोढा यांना गंभीर इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका करुन रयतेचे राज्य स्थापन केले होते. पण, त्यांनी कधीच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. त्यामुळे हिंदुत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जात असेल तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इसारा परांजपे यांनी दिला आहे.
तसेच, सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपचे नेते करीत आहेत. आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी सुटका केली. या ऐतिहासिक प्रसंगाची तुलना भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गद्दारीशी केली आहे. मंगलप्रभात लोढा हे जरी संविधानिक पदावर असले तरी महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, शिवरायांच्या बद्दल त्यांच्या मनात असलेली आस्था या बद्दल मला शंका आहे, असं देखील आनंद परांजपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Bacchu Kadu | शिवरायांच्या काळातल्या घटनेची तुलना आता करता येणार नाही – बच्चू कडू
- Chandrashekhar Bawankule | “आदित्य ठाकरे खोटारडेपणाचा कळस…”; ‘त्या’ प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची नक्कल
- Sambhaji Brigade | “शिवाजी महाराजांची तुलना फितुरांसोबत करणार असाल तर…”, संभाजी ब्रिग्रेड संघटना आक्रमक
- Chhagan Bhujbal | “शिवरायांचा इतिहास माहीत नसेल तर…”, छगन भुजबळ लोढांवर संतापले


