Share

Udayanraje Bhosale | “प्रत्येक राज्याला देश झालेलं बघायचंय का?”; उदयनराजे भोसले यांचा खोचक सवाल 

Published On: 

Udayanraje Bhosale | सातारा : : “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayri) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज पुन्हा आक्रमक झालेले दिसले. उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक भूमिका मांडली. “सर्वधर्म समभाव म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि आपल्या सोयीचं वेगवेगळ्या धर्मातील लोकांना पोलराईज करायचं काम चाललंय ते कितपत योग्य आहे?”, असा प्रश्न उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून मला राज्यातील जनतेला, सर्व आमदार आणि खासदारांना विचारायचं की या मुद्द्यात राजकारण आणण्याचा संबंध नाही. महाराजांकडे आदर्श म्हणून पाहता. कोणतीही चळवळ असो याचं मूळ आणि प्रेरणास्थळ महाराज आहेत. ज्यांनी या चळवळी सुरु केल्या त्यांचाही अवमान आणि अपमान आहे.”

“देशद्रोहाचा जो कायदा आहे त्याच्या अख्त्यारीत महापुरुषांची अपमान, लिखाण, विधानं करतील त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. सर्वधर्म समभावची व्याख्या बदलली आहे का? खरंच बदलत चालली आहे का?”, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतात? आधी पाकिस्तान, बांग्लादेश हे भारतात होते. शिवराय असताना हिंदुस्तान अखंडच होता.” ज्यावेळी शिवाजी महाराजांची विस्मरण होतं त्यावेळेस काय झालं? पाकिस्तान, हिंदुस्तान, बांग्लादेश वेगळे झाले. हे जर असंच चालू राहिलं तर प्रत्येकजण व्यक्तीकेंद्रीत विशिष्ट समाजाचा विचार करत राहीलं. यामुळे समाजात तेढ तर निर्माण होणारच. पण या देशाचे त्यावेळेस तीन झाले, आता किती तुकडे होतील? प्रत्येक राज्य आता देश होणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच देशाला अखंड आणि एकत्र ठेवलं आहे”, असं उदयनराजे भोसले यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!