🕒 1 min read
मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thackeray) मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. काल निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दहिसरमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना त्यांनी मातोश्रीवर यावे असे आवाहन केले आहे. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यांनो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची. पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे!”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.
बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची…..
पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे …..!!!!#गद्दार #आदित्यठाकरे #शिवतीर्थ #याचिमण्यांनो— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 11, 2022
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनहि मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल. तसेच ज्यांना तिथे राहायचे असले, त्यांनी हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Shinde VS Thackeray : आजची सुनावणी लांबणीवर?; शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष
- IND vs ENG : सूर्याची तुफानी शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडचा १७ धावांनी विजय
- Salary Management- पगार महिन्याच्या अगोदरच संपतोय? मग हे नक्की वाचा
- Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतराबाबत शरद पवारांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…
- Ajit Pawar : अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका; म्हणाले,’मी पण कामं करतो पण कधी कॅमेरा…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
