Share

पोलिसांनो सावधान! ..अन्यथा होणार शिस्तभंगाची कारवाई

Published On: 

परभणी : पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची सर्व नियोजित कामे रितसर पध्दतीने होत आहेत. पण अनेक कर्मचारी, अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयात फिरताना आढळून आल्यास त्यांच्याविरूध्द कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी परिपत्रक काढले आहे.

जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी, कर्मचारी हे विनाकारण पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांमध्ये फिरतांना आढळून आले आहेत. याकरिता परिपत्रक काढून यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयात फिरतांना आढळून आल्यास त्यांच्याविरूध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे परिपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

परभणी जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, मोटार परिवहन विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसे बिनतारी संदेश विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अर्जित रजा मंजुरी, वैद्यकीय रजा मंजुरी, रजा रोखीकरण, पदोन्नती, कालबध्द पदोन्नती, वेतन देयके, पुरवणी वेतन देयके, प्रवासभत्ता देयके, प्रवास सवलत देयके, वैद्यकीय प्रतीपूर्ती देयके, साप्ताहिक सुट्टी देयके, सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे ही सर्व कामे विहीत नियमांचे चौकटीत व विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्यात येतात.

त्याकरिता जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येवून सदर कोणत्याही कामाकरिता कर्मचाऱ्यांना भेटण्यास येवू नये. या कामांकरिता पैसे देवू नयेत. कोणत्याही कामासंर्दभात तक्रार असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षकांशी भेटावे अथवा हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवावी, असे पोलीस अधीक्षकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!