Share

‘असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं’; ज्येष्ठ अभिनेत्रीकडे उपचारासाठीही नाहीत पैसे

Published On: 

मुंबई : बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेत्री सविता बजाज एकेकाळी प्रचंड लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आहे. त्यांच्या अभिनयाचा आणि सुंदरतेचा मोठा चाहता वर्ग होता. मात्र सविता बजाज यांच्यावर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. सध्या त्या आजारपणामुळे चिंतेत आहेत. उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सविता यांना मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘माझी स्थिती फार खराब आहे. माझ्याकडे कोणीही नाही. मी खूप पैसे कमावले होते पण सगळे उपचारांसाठी खर्च झाले. बँकेत केवळ ३५ हजार रुपये होते ते देखील काढले आहेत. गळा दाबून मला मारून टाका , मला असं जीवन नाही जगायचं. यापेक्षा तर मेलेलं बरं. या जगात माझं कोणी नाही, जो माझी काळजी घेईल,’ अस म्हणत त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

पुढे त्यांनी असही म्हटलं की, 25 वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या घरी जाण्याचा विचार केला पण कोणीही त्यांना घरी घ्यायला तयार नाही. मी खूप पैसे कमावले, अनेकांची मदत केली पण आज माझ्यासोबत कोणीच नाही.’ सविता यांनी ‘निशांत’, ‘नजराना’ आणि ‘बेटा हो तो ऐसा’ या चित्रपटांत तर ‘नुक्कड़’, ‘मायका’ आणि ‘कवच’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!