उस्मानाबाद: जिल्ह्यातील अचलेर येथे एक बंगाली डॉक्टर कोरोनाबाधीतांवर उपचार करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा बंगाली डॉक्टर रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्यावर उपचार करत होता. माहिती मिळताच येथील पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. अचलेर येथे अनेक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचेही उघड झाले आहे.
अचलेर येथे सागर गोकुळ भद्रा (उर्फ बंगाली) रुग्णालय सुरू करून अनेक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करत आहे. अचलेर येथील एका ग्रामस्थाने हा डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन उपचार देतो, अशी लेखी तक्रार केली होती. त्यानंतर अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या या डॉक्टरविरुद्ध आरोग्य विभाग व पंचायत समिती प्रशासनाकडून एक पथक तयार करुन त्याच्यावर नजर ठेवली.
मंगळवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले व इतर सहकारी आष्टाकासार येथे कोविड लसीकरण सत्रास भेट देण्यासाठी गेले असता त्यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ मुरूम पोलिस ठाण्यात संपर्क साधून पोलिस कॉन्स्टेबल संजय नायकल यांना अचलेर येथे बोलावले. पथकाने अचानक धाड टाकून या डॉक्टरला रुग्णावर उपचार करताना रंगेहाथ पकडले. या वेळी पंचांसमक्ष पंचनामा करून त्याचे रुग्णालय सील करत त्याचा सर्व ऐवज जप्त केला. त्यानंतर त्याला मुरूम पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- मराठा आरक्षण : संभाजीराजे घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट !
- ‘चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची उत्पत्ती झाली का?’, अमेरिकेचा पुन्हा एकदा चीनवर संशय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

