Share

जालन्यात सोशल डिस्टंसिंगचे वाजले तीनतेरा

Published On: 

🕒 1 min read

जालना: गेल्या १८ दिवसांपासून जालन्यात संचारबंदी लागू होती, मात्र आता काही प्रमाणात शिथिलता आल्याचे चित्र बघायला मिळत आहे आणि याचाच गैरफायदा नागरिक घेत आहेत. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले आहेत. काही लोकांच्या तोंडाला मास्क देखील नव्हते तर सोशल डिस्टंसिंगचा तर पुरता फज्जा उडवल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पोलीस असूनही त्याचा काही फायदा झाला नाही.

जालना शहरासह जिल्ह्यात मागील महिन्यात १४ ते ३० एप्रिलपर्यंत व आता १ मे पासून येत्या १५ मेपर्यंत संचारबंदी लागू आहे. एप्रिलच्या १५ दिवसांमध्ये शहरातल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. मात्र,पंधरा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा वाढवण्यात आलेल्या संचारबंदी काळात शहरातील रस्त्यावर रहदारी वाढली आहे. संचारबंदी असूनही त्याचे काहीच घेणे देणे नाही असा अविर्भाव येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

जालना शहरात १८ दिवसांपासून लागू असलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीत काहीशी शिथीलता आल्याचे चित्र बाजारात पहावयास मिळत आहे. सकाळी गर्दीत विक्रेते व ग्राहक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे भान ठेवत नसल्याने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू सर्व नियम धाब्यावर बसून खरेदी-विक्री केली जात आहे. गर्दीच्या रेट्यापुढे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस यंत्रणेचे मनुष्यबळ कमी पडत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!