Share

बंगाल निवडणूक :पत्रकारांच्या वाहनावर अज्ञात समुहाकडून प्रहार,महिला पत्रकार जखमी

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर संपूर्ण देशाच लक्ष लागलेल आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. १० मार्च रोजी नंदीग्राम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारी ममता बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आणि याच मतदारसंघात ममता बॅनर्जी या जखमी झाल्या होत्या.

आज दुसऱ्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान होत आहे. नंदीग्राम या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदु अधिकारी एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. यांच्यात मुख्य लढत होत आहे. हि रणधुमाळी सुरु असतांना पुन्हा एकदा हिंसाचार पाहायला मिळत आहे. आज दुपारी शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती.

तसेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पश्चिम बंगाल येथील मोदिनीपूरमध्ये या भागात घडली आहे. गुरूवारी मोदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर या ठिकाणी एका अज्ञात समुहाने माध्यमांच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हल्ला केला.

पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांवर हल्ला आल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आज गुरूवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. बंगालमधील गुरूवारी झालेल्या ३० मतदारसंघांपैकी केशपूर हा एक मतदारसंघ आहे. माध्यम संस्थेने असाही दावा केला की, या करण्यात आलेल्या हल्ल्यात एक महिला पत्रकारदेखील गंभीर जखमी झाली आहे.

सकाळपासूनच बंगालमधील वेगवेगळ्या भागातून हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. तर ममता बॅनर्जी मतदान केंद्रावर पाहणीसाठी व्हील चेअरवर पोहोचल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!