मुंबई : कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद होते. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत होते. ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नसणे आदी बाबींमुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होत होते.
याच पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील पालकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण सुरू केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने महाराष्ट्र सरकारने काही भागात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जुलैपासून राज्यातील किती शाळा सुरु झाल्या याची माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
राज्यात एकूण शाळांची संख्या 19997 असून त्यापैकी 5947 शाळा उघडण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 45,07,445 असून त्यापैकी 4,16,599 विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी नोंदवली, असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, सातारा, मुंबई मनपा या ठिकाणी एकही शाळा सुरु झालेली नाही. सर्वाधिक शाळा कोल्हापूरमध्ये 940 तर औरंगाबादमध्ये 631 शाळा सुरु झाल्या आहेत.
१५ जुलै रोजी राज्यातील शाळांत इ. ८ वी ते इ. १२ वी पर्यंतचे वर्ग भरवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण शाळांची संख्या व त्यापैकी किती शाळा उघडल्या तसेच जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या व त्यापैकी किती विद्यार्थी शाळेत आले,याबाबतची माहिती खालील तक्त्यात नमूद आहे.कृपया पहा. pic.twitter.com/3FmL3y777n
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 17, 2021
शाळा सुरु करताना त्या संदर्भात आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना संबंधित शाळांना दिल्या गेल्या आहेत. तसेच शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार
- राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेस विरोधातील; मोदी-पवार भेटीनंतर भाजप नेत्याचे सूचक विधान
- राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे – दरेकर
- सीडीला मुहूर्त नाहीच ? ईडी चौकशीबाबत खडसे म्हणाले…
- मनसेत मोठी हालचाल ; राज ठाकरे सोपवणार अमित ठाकरेंकडे ‘ही’ मोठी जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

