Share

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आव्हानानंतरही बेळगावात भाजपाची मुसंडी

Published On: 

बेळगाव – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच बेळगाव लोकसभा निवडणुकीची मतमोजणीही सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये बेळगावमध्ये काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजपाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई दिसत आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी ११०२६ मतांनी आघाडी घेतली आहे. अंगडी यांना १०३७९६ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांच्यावर अंगडी यांनी सुमारे ११०२६ मतांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे जारकीहोळी यांना ९४७७० मते मिळाली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना २६३७७ मते मिळाली आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते. याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!