Share

अॅशेस मालिका सुरू होण्यापूर्वी बेन स्टोक्सने वडिलांच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट

Published On: 

नवी दिल्ली : अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात आज ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) ने काही दिवसांपूर्वी संघातील 11 खेळाडूंची घोषणा केली, त्यानंतर काल इंग्लंड (England) क्रिकेट संघानेही 12 खेळाडूंची घोषणा केली. ब्रिस्बेन कसोटीसाठी नाणेफेकीच्या वेळी कर्णधार जो रुट (Joe Root) अंतिम अकराची निवड करेल. अनेक महिन्यांनंतर इंग्लंड संघात पुनरागमन करणारा महान अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) ने सामन्यापूर्वी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करून आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढली.

बेन स्टोक्सने आपल्या वडिलांच्या आठवणी आणि संघात पुनरागमन करण्याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली की, ‘काही महिन्यांपूर्वी मला खात्री नव्हती की मी कधी मैदानात परतू शकेन. मला हे आश्चर्यकारक वाटते की मी उद्या खेळायला जाईन , बरोबर 1 वर्षानंतर, मला तुमची आठवण येईल. आणि या संपूर्ण आठवड्यात तुम्ही माझ्यासोबत असाल. बेन स्टोक्सचे वडील जेरार्ड स्टोक्स यांचे गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी निधन झाले होते. याशिवाय बेन स्टोक्सने सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी लिहिले की, ‘मी एका मोठ्या सामन्यासाठी तयार आहे.’

https://www.instagram.com/p/CXLsuy4sEYu/?utm_source=ig_web_copy_link

बेन स्टोक्सने जुलैमध्ये पाकिस्तानविरुद्ध वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतला होता. त्यानंतर मानसिक आरोग्य आणि बोटाच्या दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर गेला. यादरम्यान, त्याने भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला नाही, ज्यामुळे इंग्लंड संघाला त्याचा फटका सहन करावा लागला. भारताने इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी सामन्यांमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली, त्यानंतर टी-20 विश्वचषकातील इंग्लंडचा प्रवास उपांत्य फेरीत थांबला. पण आता हा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!