Share

लातूरमध्ये ताळेबंदीत तृतीयपंथीयांना आधार!

Published On: 

लातूर: राज्यात तसेच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून ग्रामीण भागातही याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या रुग्णांची संख्या जास्त आणि खाटांची संख्या कमी, असे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात देखील अशीच विदारक परिस्थिती आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे अनेकांचे हातचे काम देखील गेले आहे तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच तृतीयपंथीयांवर देखील अशीच वेळ आली आहे. मात्र त्यांच्या मदतीसाठी खा. सुधाकर शृंगारे पुढे आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सर्वत्र ताळेबंदी घोषीत करण्यात आलेली असताना जिल्ह्यातील तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आल्याचे समजताच जिल्ह्याचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी समाजाने नेहमीच उपेक्षित ठरवलेल्या तृतीयपंथी घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत तृतीयपंथीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन एक अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प ठरवला.

युवा नेते शंकर श्रृंगारे यांच्या पुढाकारातून तृतीयपंथीयांना ताळेबंदीत पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत होती, ती थांबवावी व ताळेबंदीमुळे त्यांच्यावर आलेली उपासमार दूर व्हावी या हेतूने त्यांना आधार देऊन दोन महिने पुरेल अशा दर्जेदार अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. यावेळी तृतीयपंथी यांच्या वतीने प्रिती माऊली लातूरकर, साक्षी माऊली लातूरकर हे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!