🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.
मात्र या दौऱ्यात श्रेयस अय्यर आणि टी नटराजन यांना या दोन महत्वाच्या खेळाडुंना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. श्रेयस अय्यर आणि टी नटराजन हे दोन्ही खेळाडू काही दिवसापुर्वी दुखापतग्रस्त झाले होते. काही दिवसापुर्वीच दोघेही दुखापतीतून सावरले असुन पुनरागामन करण्याच्या तयारीत होते. मात्र श्रीलंका दौऱ्यापुर्वी दोन्ही खेळाडु पुर्णपणे दुखापतीतून सावरले नसल्यामुळे त्यांच्या फिटनेसबद्दल बीसीसीआयला कोणतीही जोखीम उचलायची नव्हती. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही खेळाडु भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावु शकतात. त्यामुळे या दोन्ही खेळाडुंना या दौऱ्यात संधी नाकारण्यात आली.
यावर्षी मायदेशीतील इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासुन तो क्रिकेटपासुन दुर आहे. तर आयपीएल 2021 स्पर्धेदरम्यान टी नटराजनची गुडघ्याची दुखापत वाढल्याने त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासुन तोही क्रिकेटपासुन दुर आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये; लातूर कृषी विभागाचे आवाहन
- ‘चाहता वर्ग पूर्वीसारखा राहिला नाही…’, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली जुनी आठवण
- इंग्लंडमध्येही पंतचा फॉर्म कायम ; न्यूझीलंडला दिला इशारा!
- उसळता चेंडु डोक्याला लागल्याने रसेल जखमी, पुढील उपचारासाठी रुग्णालयात भरती
- पंजाबमध्ये अकाली दल-बसपा आघाडी; कॉंग्रेस आणि भाजपच्या अडचणी वाढणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
