Share

तलाक दे म्हणत विवाहितेस मारहाण; पाच जणांना अटक

Published On: 

औरंंगाबाद : तलाक दे म्हणत घरात घुसून विवहीतेला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पुंडलीकनगर पोलिसांनी पतीसह पाच जणांना अटक केली. इम्रान शेख निजाम शेख (वय २५), नसीमा बी शेख निजाम शेख (वय ५५), अक्रम शेख निजाम शेख (वय ४२), परविन शेख कदीर शेख (वय ३७) आणि कदीर शेख अमीर शेख (सर्व रा. रहमानिया कॉलनी) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

सलमा इम्रान शेख (वय २५, रा. रहेमानिया कॉलनी, ह.मु. अल्ताफ कॉलनी, गारखेडा परिससर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २०१२ मध्ये पीडितेचा विवाह इम्रान शेख याच्याशी झाला. त्यांना तीन आपत्य आहेत. मात्र वडीलांकडून पैसे घेवून ये म्हणत वरील आरोपी पीडितेला वारंवार मारहाण करित होते. ३ जून रोजी सुध्दा आरोपींनी सलमा शेख यांना मारहाण करुन घरातून हाकलून लावले.

१४ जून रोजी पीडितेचे वडील व भाऊ घरात नसतांना इम्रान शेख हा नातेवाईकांसह पीडितेच्या घरात घुसला. व त्याने तुझे आणि माझे जमनार नाही, तु मला तलाक दे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!