Share

आधुनिक व्हा मात्र आपल्या परंपरा जपा; खेळाच्या मैदानातून शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा युवकांना सल्ला..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: आजकाल नवीन पिढीला मोबाइल व ऑनलाईन राहण्याचे व्यसन लागले आहे. आधुनिक व्हा, मात्र आपल्या परंपरा व शारीरिक व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी खेळ अनिवार्य करावे लागत आहे. सर्वच गोष्टी ऑनलाईन व घरबसल्या होत नाही. त्यामुळे दीर्घायुष्य व मजबूतीसाठी ऑनलाईनच्या जमान्यात मैदानी खेळ टिकले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी केले. स्व. वैजापूर येथे माजी आमदार आर. एम. वाणी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देवा ग्रुप विजेत्यानां बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते.

वैजापूर तालुक्यात शिवसेना, युवासेनेच्या वतीने आयोजित स्व. माजी आमदार आर. एम.वाणी क्रीडा चषकाच्या फायनलमध्ये देवा ग्रुप क्रिकेट संघाने पोलीस क्रिकेट संघावर मात करून विजेतेपद पटकाविले. चषकासह १ लाख ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या हस्ते स्वीकारले. द्वितीय पारितोषिक पोलीस क्रिकेट संघाने पटकावले. त्यांनी १ लाख १ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. रविवारी झालेल्या सेमी फायनल व फायनलमध्ये चुरशीची लढत बघावयास मिळाली. प्रथम बक्षीस देवा ग्रुप क्रिकेट संघ १ लाख ५१ हजार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातर्फ़े व द्वितीय बक्षीस पोलीस क्रिकेट संघ १ लाख १ हजार यांना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यातर्फे देण्यात आले.

तृतीय बक्षीस परदेशी क्रिकेट संघ ७१ हजार रुपये आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्यातर्फे तर चौथे बक्षीस गोल्डन क्रिकेट संघ ५१ हजार रुपये, उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्यावतीने देण्यात आले. तसेच मॅन ऑफ द मॅच दिलीप बिडवा, बाळू हिवाळे, बेस्ट बॉलर अनिल न्हावले, बेस्ट बॅटस्मन विश्वा राजपूत, मॅन ऑफ द सीरीज कृष्णा पवार, बेस्ट समालोचक अलंकार बानखेळे, बेस्ट फिल्डर श्रीकांत शिंदे, हॅट्ट्रिक मिलिंद बिडवा, पहिले अर्धशतक सुनील खर्डे व बेस्ट कीपर म्हणून योगेश पवार यांना टीव्ही, सायकल, रोख रक्कम व शिल्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!