Share

काळजी घ्या…पुण्यात आज कोरोनामुक्तांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचा आकडा अधिक

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यात आज कोरोनामुक्तांपेक्षा नव्या कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे.

‘आज (दि. २० जून) २६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील २५५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६४ हजार ७६० झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या (ऍक्टिव्ह रुग्ण) २ हजार ५६३ रुग्णांपैकी ३७७ रुग्ण गंभीर तर ५३९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!