मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २५ हजार ६८१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६२ कोरोना बाधित हे मुंबईत सापडले आहेत. शहरात दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे आत्तापर्यंत मुंबईत एका दिवसात सापडलेले हि सर्वाधिक संख्या आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासातं 2834 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ८०८ रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. रुग्णांचा गेल्या २४ तासात पुण्यात कोरोनाबाधीत २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्य सरकारकडून नियमावली जाहीर –
राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये ५० टक्केच उपस्थिती ठेवावी,
नाट्यगृहं आणि सभागृहांमधली उपस्थितीही ५० टक्के ठेवावी.
सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे. सभांसाठी करता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- रिलेशनशिपबद्दल कियारा अडवाणीचे मोठे वक्तव्य
- प्रशासकीय मान्यतेचे तीनतेरा करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकाची चौकशी करण्याची मागणी
- सोनपेठ तालुक्यात गारांचा तुफान पाऊस
- मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने युक्तिवादास सुरुवात
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

