Share

शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : १८ मार्च रोजी जळगाव महापालिकेची महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली आहे. जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली आहेत. बहुमतासाठी ३८ मतांची गरज शिवसेनेला होती. त्यामुळे अवघे १५ नगरसेवक असूनही तिप्पट बलाढ्य भाजपला शिवसेनेनं आपल्या बाणाने घायाळ केलं आहे.

एकूण ७५ नगरसेवकांपैकी ५७ नगरसेवक भाजपचे, १५ नगरसेवक शिवसेनेचे तर ३ एमआयएमचे आहेत. मात्र, जळगाव महापालिकेवर शिवसेनेनं झेंडा फडकावला असून गेल्या आठवड्याभरात मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. भाजपचे २५ हुन अधिक नगरसेवक हे नाराज होते. दरम्यान, एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेना पाठींबा दिला आहे.

महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यास मदत केल्याने या नगरसेवकांवर एमआयएम पक्षाने मात्र कठोर कारवाई केली आहे. एआयएमआयएमच्या तीन नगरसेवकांसह जळगावच्या जिल्हाध्यक्षांना पक्षाने निलंबित केले आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून या तीन नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. तर, २१ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या कार्यालयात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेशही एमआयएम प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिया अहेमद अब्दुल करिम बागवान यांच्यासह महानगर पालिकेतील एमआयएम नगरसेवक रियाज अहमद अब्दुल करिम बागवान, सईदा युसूफ शेख, सुना राजू देशमुख या तीन नगरसेवकांनाही निलंबित करण्यात आले आहे. ‘भाजपापासून जेवढं एमआयएम पक्ष लांब आहे. तितकेच अंतर सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत पक्षाने आतापर्यंत कायम ठेवले आहे,’ असं देखील यात नमूद करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!