परभणी : सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव ते वडगावच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व गारांसह मुसळधार पाऊस झाला.
गंगाखेड – परळी या रस्त्यावरील सोनपेठ हद्दीतील उक्कडगाव पासून,नैकोटवाडी,करम, ते गंगाखेड पासून दहा किलोमीटर अंतरावरील वडगावपर्यंत पाऊस सुरू होता. तब्बल तीस मिनिटे तास वादळी वारे, गारांचा पाऊस सुरू होता. दोन दिवसांपासून शहरासह जिल्हाभरामध्ये ढगाळ वातावरण होते. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी शहरासह जिल्हाभरात भर उन्हाळ्यामध्ये हवेमध्ये थंडावा जाणवत होता. दरम्यान काढलीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या वर शेतकऱ्यांनी पिकांबाबत नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

