अहमदनगर : शारिरीक संबंध प्रस्थापित करत अश्लिल व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग करत लाखो रुपयांचा गंडा घालणारे मोठे रॅकेट नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. याप्रकरणी आरोपीने आणखी एकाला ब्लॅकमेलिंग करत त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नगर तालुक्यातील एका महिलेने शरीरसंबंधाचे अमिष दाखवून एका व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढले. साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाच्या वेळी त्याचे अश्लील व्हिडीओ तयार करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. पैसे न दिल्यास व्हिडीओ पोलिसांना दाखवून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील या महिलेने त्याला दिली होती. संबंधित व्यक्तीने नगर तालुका पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
पोलिसांनी तात्काळ महिला व नगर शहरातील कायनेटीक चौकात राहणारा तिचा साथीदार आरोपी अमोल सुरेश मोरे यांना अटक केली. दरम्यान, त्यांनी आणखी कोणाला आपल्या जाळ्यात ओढून असे कृत्य केले आहे का? याची चौकशी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सुरू करताच त्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
या महिलेच्या जाळ्यात नगर तालुक्यातील आणखी एक व्यावसायिक अडकला होता. आपल्यासोबत देखील असे घडले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणातील हमीदपुर येथील आरोपी सचिन भिमराज खेसे याला ताब्यात घेतले. आरोपी खेसे याला खाक्या दाखविताच त्याने हा प्रकार साथीदार जखणगावची ‘ती’ महिला, अमोल सुरेश मोरे, महेश बागले व सागर खरमाळे (दोघे रा. नालेगाव, नगर) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींसमोर गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही, मात्र गडकरीच पंतप्रधान पाहिजेत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
- ‘ही वेळ मोर्चे काढण्याची नाही, आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो’
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत


