Share

सावधान! शहरातही डेलटाचा रूग्ण; प्रशासन म्हणते घाबरण्याचे कारण नाही पण सतर्कता आवश्यक 

Published On: 

औरंगाबाद : शहरातील वाळूज परिसरात कोरोनाच्या डेलटा व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण असले तरी घाबरण्याची गरज नसून, केवळ सतर्कता व सावधानी बाळगणे. यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

शहरात सोमवारी वाळुज परिसरात डेल्टा व्हेरियंटचा रूग्ण आढळून आला. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे सर्वत्र चिंता पाहायला मिळाली. परंतु संबंधित रूग्ण
हा ३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर रुग्णाने एका खासगी रुग्णालयात पाच दिवस उपचार घेतले. तब्येत चांगली झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पुनश्च फॉलोअप साठी सात दिवसानंतर गेल्यानंतर त्यांना इतर त्रासासाठी नॉन कोविड वॉर्डात भरती करण्यात आले होते. तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना पाच दिवसानंतर सुट्टी देण्यात आली. दरम्यान त्यांच्यात डेल्टा

व्हेरियंट आढळला असला तरी, त्यांची प्रकृती मात्र स्थिर आहे. त्यांना कुठलाही त्रास नाही. यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मनपा प्रशासन सज्ज आहे. परंतु नागरिकांनी सतर्क राहावे व सावधानता बाळगावी. यासह वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी गोष्टींची काळजी घ्यावी. असे आवाहन मंडलेचा यांनी नागरीकांना केले आहे.

अन् प्रशासनाची उडाली धावपळ….

संबंधित रुग्णाचा अहवाल येताच, जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर टीम त्या रुग्णाकडे पाठविण्यात आली. या अनुषंगाने पुढे जिल्हाधिकारी कार्यालयातही मॅरेथॉन बैठक पार पडली. यात विविध सुचना करण्यात आल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!