दिल्ली : युएईमधील देशात आयपीएलचे १३वे सत्र पार पडत असून आता हे सत्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. कोरोनाच्या वातावरणातून आयपीएलने नवा उत्साह निर्माण केला होता. यावर्षी देखील प्ले-ऑफ गाठण्यासाठी संघांना चांगलाच सामना करावा लागला. पहिली क्वालिफायर जिंकून मुंबई इंडियन्सने थेट अंतिम सामन्यात धडक दिली तर द्वितीय स्थानावर असलेल्या दिल्लीला आणखी एक संधी आहे. तर, एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला धूळ चारत सनरायझर्स हैद्राबादने विजेतेपदाच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्याच्या घोषणेनंतर टीम निवडीवरून क्रिकेटप्रेमींसह अनेक माजी खेळाडू व क्रिकेटतज्ञांनी टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा याला देखील या टीम मधून डावलण्यात आल्याने भलताच संताप व्यक्त केला जात आहे. आयपीएलमधील सामन्यावेळी गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असे तर्क लावत निवड समितीने त्याच्या निवडीवर सावध भूमिका घेऊन प्रतिक्षेची भूमिका घेतली होती.
यानंतर, आयपीएलच्या अंतिम साखळी सामन्यात रोहितने पुनरागमन करून आपण फिट असल्याचं दाखवून दिलं होतं. सद्या तो आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. दरम्यान, रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जागा न मिळाल्यामुळे बीसीसीआयवर चौफेर टिका करण्यात येत होती. बीसीसीआयला प्रश्न विचारण्यात येत आहे की, जर रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फिट आहे, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनफिट कसा?
आता, रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात निवड करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. बीसीसीआय सुत्रांनुसार, भारतीय संघाचे फिजिओ नितिन पटेल रोहित शर्माच्या दुखापतीवर लक्ष देणार असून ते रोहितवर उपचारही करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मी हॅमस्ट्रिंग दुखापतीमधून बरा झालो आहे – शर्मा
आयपीएलच्या अंतिम साखळी सामन्यात रोहितने पुनरागमन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, हॅमस्ट्रिंग दुखापतीमधून मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. दुखापतीमुळे दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर मैदानावर परतल्याने मी आनंदी आहे. मैदानावर खेळण्याचा आनंद वेगळा असतो. काही सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर बघू कसे काय होते. हॅमस्ट्रिंग आता पूर्णपणे बरे झाले आहे, असा खुलासा खुद्द रोहित शर्माने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर
- अजून एक दणका!, अर्णबचा मुक्काम आता ‘या’ कारागृहात!
- शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांची होणार कोरोना चाचणी – वर्षा गायकवाड
- भारतीय वंशाची महिला अमेरिकन उपराष्ट्रपती होणार; जाणून घ्या या महिलेबद्दल
- मुख्यमंत्री ठाकरे आज दुपारी जनतेशी साधणार संवाद!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

