🕒 1 min read
नवी दिल्ली : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले. अशा स्थितीत मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांबाबत चिंता निर्माण झाली होती. या पार्श्ववभूमीवर क्रिकेट चाहत्यांमध्ये आयपीएल होणार की नाही याबाबत संभ्रम होता. पण, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएल २०२१चे सामने ठरल्याप्रमाणे मुंबईतच होतील, अशी माहिती दिली.
दरम्यान, बीसीसीआयने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यंदा आयपीएलच्या स्पर्धा 6 ठिकाण खेळवण्यात येत आहेत. परंतु या स्पर्धा प्रेक्षकविना खेळवल्या जाणार आहेत. तसेच खेळाडूंसाठी बायो-बबल तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रत्येक संघाच्या खेळाडूंमध्ये वाढ करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद नाभिक महामंडळाचा विरोध
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील ; पंकजा मुंडेंचे मोठे विधान
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
