औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विविध व ठिकठिकाणी सव्वा कोटीचे कामे मंजुर करण्यात आले असून ते लगेच सुरु होणार आहे.
यात दरेगाव येथे तीन कामे सिमेंट रस्ते काम, स्मशान भुमि सुशोभीकरण, रस्ता मजबुतीकरण, शाळा बांधकाम, सोबलगाव येथे स्मशानभूमीत सुशोभीकरण, दुरुस्ती बाजारसावंगी शाळा बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखान्यात अधुनिकीकरण बळकटीकरण, शाळाखोली दुरस्ती, बोडखा नवीन शाळा बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखान्यात अधुनिकीकरण बळकटीकरण काम, टाकळी राजेराय येथे ९ लाख ३५ हजार रूपयाचे काम, लोणी येथे शाळा खोली दुरस्ती तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पेवर ब्लॉक्स आदी विविध गावात विविध कामे १ कोटी १८ लाख ३५ हजाराची मंजूर करण्यात आली असून लगेच सुरू होणार आहे.
या सर्व कामांमुळे बाजारसावंगीचा चेहरा मोहरा बदलणार असून, हि सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच रखडलेल्या काही कामांचा समावेश यात असल्यामुळे विकासाला गती मिळणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाने मृत झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या वारसदारांना ५० लाखांचा विमा प्राप्त
- बीडच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुखांचा बदल, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी
- पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते पंधरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- ‘आप से बेहतर उम्मीद किये थे हम’, मिम्स शेअर करत सेहवागने व्यक्त केली नाराजी
- मायकेल वॉनने पुन्हा उडविली भारतीय चाहत्यांची खिल्ली ; म्हणाला, मला माफी मागावी लागेल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

