Share

अजित पवारांच्या समर्थनार्थ पुण्यात बॅनरबाजी; हातात तलवार घेतलेला फोटो ठरला चर्चेचा विषय

Published On: 

पुणे : राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. पवार यांच्या संबंधित साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी तसेच त्यांच्या बहिणींच्या घरीही आयकर विभागाने केलेली कारवाई. त्यानंतर तपास यंत्रणांनी अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील दक्षिण भागांमध्ये पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.

विशेष म्हणजे बॅनरवर अजित पवार यांचा तलवार हातात घेतलेला फोटो आहे. फक्त एवढेच नाही तर जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करु नये, असा आशय बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे.

दरम्यान, पवार सध्या आयकर विभागाच्या कारवायांनी दुखावले असून समाज माध्यमांशी बोलतांना होते की,’माझ्यावर काय कारवाई करायती ती करा, छापेमारी करा, पण अजितदादांच्या बहिणी म्हणून कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही’, असे ते म्हणले. अजित पवार यांचा पुण्यात दौरा होता. तेव्हा पुण्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढून त्यांचे स्वागत केले. आता रॅलीला १० दिवसही पूर्ण होत नाही तोपर्यंत आता पुण्यातील दक्षिण भागांत पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात लावण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!