Share

बँकेची ‘ही’ सुविधा १४ तासांसाठी राहणार बंद – रिझर्व्ह बँक

Published On: 

मुंबई: बँक व्यवहार करण्यासाठी सध्याच्या काळात बँकांच्या अनेक सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात यामध्ये ऑनलाइन बँकिंग, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर, रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट, यांचा उल्लेख करता येतो. तर कोरोना काळात बँकांच्या या सुविधांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली मात्र यातील आरटीजीएस ही सुविधा शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तासांसाठी बंद असेल अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आरटीजीएस सुविधा गेल्यावर्षी १४ डिसेंबरपासून २४ तास उपलब्ध आहे. मात्र १७ एप्रिलला डिझास्टर रिकव्हरीच्या वेळेला अधिक सुधारण्यासाठी तांत्रिकदृष्या अद्ययावत करण्यासाठी ही सेवा काही वेळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना बँक व्यवहार करताना अडथळा निर्माण होऊ शकतो.

१७ एप्रिल रोजी कामकाज संपल्यानंतर आरटीजीएस प्रणाली १८ एप्रिल रोजी रात्री (शनिवारी रात्री) १२.०० वाजल्यापासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सदस्य बँकांनी आपल्या ग्राहकांना त्यानुसार आपल्या व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याची सूचना करावी. असे रिझर्व बँकेने सांगितले. तर नुकतच आरटीजीएस आणि एनईएफटीसाख्या सुविधा अन्य काही संस्थांनाही सुरू करण्याची घोषणा केली होती. या तरतुदीमुळे आरबीआयन फिनटेक आणि पेमेंट कंपन्यांनासुद्धा सेंट्रलाइज पेमेंट सिस्टिमच्या या दोन पर्यायांमध्ये सामील करून घेतले आहे. आतापर्यंत ही सुविधा केवळ बँकांसाठीच उपलब्ध होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!