औरंगाबाद : खरिप पीक कर्ज हंगाम २०२१-२२ ची आढावा बैठक सोमवारी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय कन्नड येथे आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस उपविभागीय अधिकारी विधाते, तहसीलदार संजय वारकड, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कारेगावकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक तसेच सहायक निंबधक वाढेकर, तहसील कार्यालयाचे महसूल सहायक ढगे व तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकेचे, ग्रामीण बँकेचे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
२०२०-२१ साठी पीक कर्ज वाटपाचे इष्टांक १६६.६७ कोटी रुपयाचे होते त्यानुसार १२९ टक्के उद्दीष्ट साध्य करण्यात आले आहे. तसेच या वर्षी २०२१-२२ या वर्षासाठीचे लक्षांक खरीप व रब्बी मिळून २१६.६७ इतका देण्यात आलेला आहे. हा इष्टांक १०० टक्के पूर्ण करण्याबाबत या बैठकीमध्ये सूचना दिल्या. तसेच किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज खरीप व रब्बी २०२१-२२ साठी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.
शासनाच्या महाभूमी पोर्टल उपलब्ध होणारे क्यूआरकोड व १६ अंकी पडताळणी क्रमांक असलेले डिजिटल स्वाक्षरीत डेटा बेस आधारित गाव नमुना नंबर सातबारा गाव नमुना नंबर ८अ आणि गाव नमुना नंबर ६ इत्यादी नमुन्याचा अधिकार अभिलेख विषयक उतारा व सर्व शासकीय कायदेशीर काय व निमशासकीय कामकाजासाठी वैध राहणार असल्याने शेतक-यांकडे इतर कागदपत्रांची मागणी बँकांनी करू नये अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या
- एक महिना तीन दिवस झाले तरी राज्य सरकाने स्वतंत्र पुनर्विचार याचिका का दाखल केली नाही?
- ‘पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडीनेही राज्यातील गरिबांना भरघोस मदत करावी’
- उरवडे येथील आगीला जबाबदार कोण ? गृहमंत्री म्हणतात…
- “पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन
- ‘नरेंद्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य सरकारने करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

