टीम महाराष्ट्र देशा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामाफत समाजातील तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याबरोबरच बॅंकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्टे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पाटील बोलत होते. यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी निशांत ईलमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ठेवण्यात येतात. राष्ट्रीयकृत बॅंकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजनेंतर्गत मराठा तरुणांनी केलेल्या कर्जाच्या मागणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. बॅंकांनी तरुणांची प्रकरणे विनाकारण नाकारू नयेत. त्याचबरोबर सहकारी बॅंकांनीही तरुंणाना कर्ज उपलब्ध करुण द्यावे.
तसेच महामंडळाच्या माध्यमातून ज्या बॅंकांकडून कर्ज घेतले आहे, त्याची परतफेड विहित वेळेत करावी. येणाऱ्या कालावधीमध्ये या योजनेसंदर्भात अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरावरही बैठकांचे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
