🕒 1 min read
नवी दिल्ली : उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने मालमत्ता विक्रीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत चार मध्यम आकाराच्या बँकांची निवड केली आहे. बँकिंग क्षेत्राच्या खासगीकरणामुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील, असे बोलले जात आहे. दुसरीकडे, जास्तीत जास्त निर्गुंतवणुकीतून पैसा उभारण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारी बँकांना खासगी क्षेत्राकडे सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयविरोधार सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी सोमवार पासून दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर होते. 9 राज्य बॅंकांच्या संघटना, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सोमवारी आणि मंगळवारी संपाची घोषणा केली होती. त्याचबरोबर रेल्वे देखील खासगीकरणाच्या उंबरठ्यावर आहे.
दरम्यान आता येत्या ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्गांचं खासगीकरण करून एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
या संदर्भात सविस्तर माहिती देताना त्यांनी रेल्वेच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे आणि हा निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. सीआयआयच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

