Share

निर्बंध असूनही 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येईना, थोरातांनी दिल्या ‘या’ सूचना

Published On: 

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णवाढ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्‍याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. निर्बंध असूनही राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली.

यावेळी थोरात म्हणाले, ‘या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढण्यामागेच्या कारणाचे स्वरुप प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे आहे. परंतु त्याप्रमाणे आम्ही सूचना दिलेल्या आहेत. बारकाईने सर्वेक्षण करा. जे बाधित असतील, ज्यांना लक्षणे असतील त्याचे विलगीकरण करा. होम क्वारंटाईन करण्या अर्थ नाही. आम्ही या मताचे आहोत असे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, ज्यांची व्यवस्था चांगली आहे, त्यांचे समजू शकतो. परंतु ज्यांच्याकडे व्यवस्था चांगली नाही आहे, अशा व्यक्तींना घरात क्वारंटाईन केल्याने, तो संपूर्ण घराला बाधित करतो आणि बाहेर पडून बाहेरच्या लोकांना देखील बाधित करत असतो. म्हणून कोणत्याही परिस्थिती होम क्वारंटाईन अजिबात करू नये. त्यामुळे आता त्यांच्यासाठी विलगीकरणाची व्यवस्था करावी. तिथेच प्राथमिक उपचार केले तर त्याला पुढे रुग्णालयात जाण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ असे थोरात यांनी सांगितले.

या पंधरा जिल्ह्यात  बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 44 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकंदर संख्या 50 लाख 70 हजार 801 झाली आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातला दर 91 पूर्णांक 74 शतांश टक्के झाला आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याच्या प्रमाणातली घट राज्यात कायम आहे. राज्यात काल दिवसभरात 29 हजार 644 नवबाधितांची नोंद झाली. तर 555 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!