मुंबई – देशात मागील काही वर्षापासून धर्माच्या नावावर राजकारण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. लोकशाही, संविधान यांना संपवण्याचे कारस्थान रचले जात आहे. परंतु भारत हा लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या तत्वावर चालणारा देश आहे असं प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
टिळक भवन येथे अहमदनगर जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, जयप्रकाश छाजेड, शरद आहेर, सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, भाईजान आदि उपस्थित होते.
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी मिळून राज्यात एक भक्कम पर्याय उभा केला आहे. दोन वर्षात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अनेक संकटांचा सामना करत विविध कल्याणकारी योजना राबविल्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, अतिवृष्टी, चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीपोटी भरपाई दिली, कोरोना संकटावर चांगल्या प्रकारे मात केली. मविआ सरकार लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले आहे म्हणूनच विधान परिषद निवडणुका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत मविआला जनतेने मोठा प्रतिसाद दिला, असे थोरात म्हणाले.
अहमदनगर शहर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष जुबेर बाबामिया सय्यद, समाजवादी पार्टीचे शहर संघटक शेख मोहम्मद हनीफ जहागीरदार, पद्मशाली समाजाचे नेते नारायण विश्वनाथ कोडम, भारिप बहुजन महासंघाचे भिंगारचे माजी शहराध्यक्ष सागर दत्तात्रेय चाबुकस्वार यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात कोरोना चाचण्या न करणे हा प्रकार घडला नाही – नीलम गोऱ्हे
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- आमचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही – भाजपा


