🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात कोरोना वाढला कारण महाराष्ट्रातील सरकार, प्रशासन, आरोग्य विभाग व नागरिक स्वतःच्या जबाबदारीने काम करत होते. इतर राज्यांप्रमाणे कोरोना चाचण्याच न करणे हा चुकीचा उपाय येथे झाला नाही. अशा महायुद्धाच्या काळात आपण सर्वांनी मिळून केलेले काम कौतुकास्पद आहे. माणूस जगला पाहिजे यासाठी आरोग्य सेवा, मोफत रुग्णवाहिका, मास्क, सॅनिटाइजर, अन्नधान्य वाटप, आदी अनेक कार्यासोबत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मनोबल वाढवून धीर देण्याचे काम ज्या योद्धांनी केले त्या सर्वांच्या प्रती नीलम गोऱ्हे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
महाविकास आघाडी पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने आयोजित कोविड योद्धा, शौर्य, पत्रकारिता पुरस्कार तसेच कोरोनाच्या परिस्थितीत समाजसेवा केलेल्या सेवकांचा कृतज्ञता पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. पिंपरी-चिंचवड येथील वाय.सी.एम हॅास्पिटलच्या चाणक्य सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी डॉ. राजेंद्र बाबळे, सचिन भोसले, सजोग वाघीरे पाटील, कैलास कदम, उर्मिला काळभोर आदी मान्यवर व पुरस्कार्थी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना मुक्त गावांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील दहा जिल्हांचा दौरा जेव्हा केला तेव्हा गावातील अनेक नागरिकांनी त्यांचे कोरोनामुक्त होण्याचे रहस्य सांगितले. त्यात महत्वाचे म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी सतत होत असलेला संवादात ही गावे सामील होत होती असे त्यांनी सांगितले. या संवादातील सुचनांचे पालन केल्याने कोरोना मुक्त गाव ठेवू शकलो असे त्यांनी सांगितले. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. लवकरच राज्यात देखील अशी स्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- आमचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही – भाजपा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
