🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अकलूज येथील डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॅाग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले धवलसिंह हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार ही केला होता. परंतु राष्ट्रवादी पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवेशानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी धवलसिंग मोहिते पाटील यांचे कौतुक करत भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. धवलसिंग मोहिते पाटील हे कार्यशील आहेत. धवलसिंग मोहित पाटील मदतीला धावून येणारे आहेत. त्यांनी बिबट्या मारला ते मला आजच कळाले. माणूसकी संपली की धवलसिंग त्यांचा गेम करतात. आता भाजपाचे काही खरे नाही. असा टोला थोरात यांनी लगावला आहे.
तर, धीरज देशमुख यांचे मी आभार मानतो. कॉंग्रेस कठीण परिस्थितीमधून खूप वेळा गेला आहे. आज आपण अडचणाीत आहेत. पण काँग्रेस पुन्हा एकदा उभी राहिलं,” अशी प्रतिक्रिया बाळसाहेब थोरात यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- संतप्त नागरिकांचा पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराव
- 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी – राज्यमंत्री संजय बनसोडे
- ‘टाटा सफारी’चं वादळ पुन्हा घोंगावणार, ‘या’ कारणामुळे ठरणार २०२१ मधील बेस्ट SUV
- मोदी सरकारचे मोठे यश; देशातल्या थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ प्रचंड वाढला
- प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथामध्ये ‘राम मंदिरा’ने पटकावला पहिला क्रमांक !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

