मुंबई:- विधिमंडळाच्या 2 दिवसीय हिवाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत.
अधिवेशन काळात सभागृहात चर्चा होणं अपेक्षित असतं. पण दोन दिवसांचं अधिवेशन घेत सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. एक दिवस शोक प्रस्ताव आणि दुसऱ्या दिवशी काय चर्चा होणार आहे? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
"जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नांपासून पळ काढणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार"
— Narayan Rane (@MeNarayanRane) December 14, 2020
खासदार नारायण राणे यांनी देखील सरकारवर तोफ डागली आहे. जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नांपासून पळ काढणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार आहे असं राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- कापूस खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 19 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
- शेतकरी आंदोलन लवकर मागे घेतले नाही तर…,’सीआयआय’ने दिला धोक्याचा इशारा


