Share

देशभरात आंदोलन सुरु असताना मोदींची जादू कायम, गोव्यात भाजपचा दणदणीत विजय !

Published On: 

पणजी : एकीकडे जाचक नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधात रोष असल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे देशभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचा विजयरथ सुसाट सुटला आहे. भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे

काल जाहीर झालेल्या गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाने जबरदस्त कामगिरी करत निर्विवाद विजय मिळवला आहे. गोव्यातील दोन जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ४९ पैकी ३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडताना एका जागेवर विजय मिळवला.

गोव्यातील ४८ जिल्हा परिषद क्षेत्रात ५० जागा आहेत. मात्र एका ठिकाणी उमेदवाराचे निधन झाल्याने तिथे मतदान झाले नव्हते. जिल्हा परिषदेसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवला. तर सात ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला चार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ आणि एनसीपी आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.

दरम्यान, गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या निकालांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ग्रामीण मतदारांनी भाजपाचे नेतृत्व आणि राज्य सरकारवर विश्वास दर्शवला आहे, असे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!