Share

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच वाईट घटना घडली; दोषीला गजाआड पाठवण्याची भाजपची मागणी

Published On: 

पुणे: वसई पोलिस ठाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. संबंधित महिलेने पुण्याच्या दौंड तालुक्यातील देलवडी गावच्या राहत्या घरी गळफास घेतला आहे. लावून आत्महत्या केली. पोलीस दलातील वाल्मिक गजानन आहिरे या कर्मचाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान यावरूनच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच वाईट घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून दौंडच्या महिला पोलिस दिपाली कदम हिनं गळफास घेतला आहे. १० दिवसांनी तिचं लग्न होणार होतं. तसेच आरोपी वाल्मीक अहिरेनं मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये आलं आहे. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्वरित दोषीला गजाआड पाठवा अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत मागणी केली आहे.

दरम्यान दीपाली बापूराव कदम असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर वाल्मिक आहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने आत्महत्येपूर्वी तिने भावाला पोलीस कर्मचारी त्रास देत असल्याचे मेसेज केले होते. आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात कलम 306,504,506 नुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दीपाली या वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. दरम्यान या घटनेचा भाजपकडून निषेध केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!