Share

‘बचपन का प्यार…’ फेम सहदेवची ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर धमाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सध्या सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे…’ हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे. हे गाणे दोन वर्षांपूर्वी सुकमा येथील मुलगा सहदेव दिरदो याने त्याच्या शाळेत गायले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान होत असून या व्हिडिओची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेज पाहायला मिळत आहे. नुकतेच सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध इंडियन आयडॉल 12 शोमध्ये बचपन का प्यार गाणं गायलेला सहदेव याने हजेरी लावली आहे.

या शोमधील सूत्रसंचालक आदित्य नारायण याने सहदेवला सोबत घेऊन स्टेजवर एन्ट्री केली. यावेळी सहदेवचे सगळेजण कौतुक करतात. यावेळी या शोची जज सोनू कक्करने त्याच्यासोबत फोटो काढण्गयाची  सगळे स्पर्धक आणि तीन जज सोनू, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक स्टेजवर येतात. स्पर्धक आणि जज सहदेवसोबत त्यांच्या गाण्यावर नाचतात.

https://www.instagram.com/tv/CSRyIo9qSCv/?utm_source=ig_web_copy_link

विशेष म्हणजे करण जोहर याने देखील या शोमध्ये उपस्थिती लावली होती. त्यावेळी करणने देखील खूप एन्जॉय केला. अशा पद्धतीने सगळण्याच्या या मंच्यावर धमाल मस्ती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या यांचा हा व्हीडीयो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता.

सुकमा येथे राहणाऱ्या सहदेवच्या घरात टीव्ही किंवा मोबाइल नाही. शिक्षकाच्या सांगण्यावरून सहदेवने हे गाणे रेकॉर्ड केले होते. सहदेवच्या गाण्याची जादू आज सोशल मीडियामध्ये सुरू आहे. त्याने आपल्या या शैलीने लाखो लोकांची मने चोरली आहेत. आजकाल हे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारचे इंस्टाग्राम रील्सही बनवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!