🕒 1 min read
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय मिळवला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे पॅनल या निवडणुकीत प्रतिस्पर्धक असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. ४ ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि आज निकाल हाती आला आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक पार पडली.
यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल ८ जागांवर तर बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनल ४ आणि अपेक्ष उमेदवारांनी ३ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच बिनविरोध निवडणून आलेले ४ उमेदवार हे सहकार पॅनलचे दोन तर परिवर्तन पॅनलचे दोन असे चार उमेदवार बिनविरोध ठरले होते. या बँकेवर सलग १० वर्ष काँग्रेसची सत्ता होती. ही सत्ता तशीच ठेवण्यासाठी बच्चू कडूंसह इतर काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले होते.
असे आहेत निकाल
सहकार पानेल ८ विजयी उमेदवार—
१.वीरेंद्र जगताप चांदूर रेल्वे
२. श्रीकांत गावंडे धामणगाव
३. सुरेश साबळे तिवसा
४. सुधाकर भारसाकडे दर्यापूर
५. हरिभाऊ मोहोड भातकुली
६. सुनील वऱ्हाडे अमरावती
७. दयाराम काळे चिखलदरा
८. प्रकाश काळबांडे सहकारी पत संस्था…
परिवर्तन पॅनल चे विजयी उमेदवार
१. राज्यमंत्री बच्चू कडू चांदूरबाजार
२. चित्रा डहाने मोर्शी
३. अजय मेहकरे अंजनगाव सूर्जी
४. जयप्रकाश पटेल धारणी
अपक्ष विजयी उमेदवार
१. अभिजित ढेपे नांदगाव खंडेश्वर
२. नरेशचंद्र ठाकरे वरुड
३. आनंद काळे अचलपूर
महत्वाच्या बातम्या
- ‘कितीही नौटंकी केली तरी..’ निलेश राणेंचा प्रियांका गांधींना खोचक टोला
- ‘देशासाठी मोठा त्याग करणाऱ्या कुटुंबातील प्रियंकांचा गुन्हा काय?’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
